भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं

kamadhenuchen vasarun | khaya na mile kay karun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥१॥ ऐसें आम्हां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें ॥ध्रु.॥ बैसोनि कल्पद्रुमातळीं । पोटासाठी तळमळीं ॥२॥ तुका म्हणे नारायणा । भले लोकीं हें दीसेना ॥३॥