भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय उणें झालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष

kay unen jhalen tuj samarthasi | aisa majapashin kon dosh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय उणें झालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥१॥ जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥२॥ तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥३॥ तुका म्हणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥४॥