भजनी मालिका
← भजनांकडे परत

कामांमध्यें काम । कांहीं म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें

kamammadhyen kam | kanhin mhana ramaram | jail bhavashram | sukh hoil duhkhachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कामांमध्यें काम । कांहीं म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१॥ कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥ जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करीं ॥२॥ केलें होतें या चि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका म्हणे वर्मे । जाणोनियां तरती ॥३॥