भजनी मालिका

भजने

कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥ द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडेंचि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कलियुगीं जन मूर्ख शून्यवृत्ति । तारिसी श्रीपति नाम घेतां ॥१॥ परम पावना पवित्रा निर्मळा । भक्ताचा सांभाळ करीं देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कलियुगीं नाम सोपें तें सुजाण । ऐशी भाषा जाण बहुतांची ॥१॥ वाल्मिक सांगतु रामनाम जपा । तरले तरती सोपा राममंत्र ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कलीचिये अंतीं होणार कलंकी । मारील म्लेंछ की घोडयावरी ॥१॥ करील धर्माची उभारील गुढी । कृतयुगा प्रौढी करीतोचि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कलीमाजीं नोहे अनुष्ठान । कालीमाजीं नोहे हवन । कालीमाजीं नोहे पठण । नोहे साधन मंत्राचें ॥१॥ नोहे योगयागाविधी । नसती अंगीं ते उपाधी । वाढतसे भेदबुद्धी । नोहे सिद्धि कोणती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कलीमाजीं सोपें घेतां रामनाम । नाहीं कांहीं श्रम जपतप ॥१॥ न लगे साधन पंचाग्री धुम्रपान । नामेंचि पावन युगायुगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कलीयुगी हो नामापेक्षा मोठे नाही योगयागयज्ञ प्रणतुल्य ॥१॥ योगयाग वर्ज करी नाम धीदेही हो घरी ||२||

रचनाकार: संत विठाबाई

कल्पतरु दाता पुंडलीक मुनी । तयासाठीं परब्रह्मा तिष्ठे अझुनी ॥१॥ नवलाव गे माय नवलाव गे माय । विटे ठेऊनी पाय उभा असे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया ॥१॥ उदंड त्या गाई ह्मैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कल्पतरूअंगीं इिच्छलें तें फळ । अभागी दुर्बळ भावी सिद्धी ॥१॥ धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कल्पद्रुमातळीं ब्रह्म पुंजाळलें कैसें दिसते सुनीळ तेजगे मज । पाहातां वेणु वेदध्वनि नाद उमटताती सहजगे बाई ये ॥१॥

कल्पना वृक्षासी देखिलें । चिंतामणीस चिंतिलें । कामधेनुसी आपेक्षिलें । जीण्या जिवविलें तेंचि हरिरुप पंढरिये ॥१॥