भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलियुगीं जन मूर्ख शून्यवृत्ति । तारिसी श्रीपति नाम घेतां

kaliyugin jan murkha shunyavrutti | tarisi shripati nam ghetan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कलियुगीं जन मूर्ख शून्यवृत्ति । तारिसी श्रीपति नाम घेतां ॥१॥ परम पावना पवित्रा निर्मळा । भक्ताचा सांभाळ करीं देवा ॥२॥ देवा तूं दयाळा जिवलगा मूर्ति । पुराणें गर्जाती वेदशास्त्रें ॥३॥ नामा म्हणे आतां नको भागाभाग । सखा पांडुरंग स्वामी माझा ॥४॥