भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलीयुगी हो नामापेक्षा मोठे नाही योगयागयज्ञ प्रणतुल्य

kaliyugi ho namapeksha mothe nahi yogayagayadnya pranatulya

रचनाकार: संत विठाबाई · अभंग
कलीयुगी हो नामापेक्षा मोठे नाही योगयागयज्ञ प्रणतुल्य ॥१॥ योगयाग वर्ज करी नाम धीदेही हो घरी ||२|| नादबिंदु नको पाही इडा पिंगळा नको काही ||३|| ब्रह्मरंध्र नको शोधुं आसन नको कभी घालु ||४|| नको भ्रमरगुंफा पाही । नको चवद चक्र काही ।।५।। हदई कमळ नको आठउ। कुंडलीनी नको शोधु ।।६।। यम अहो जाणा भागवतामदे मुख्य नाम म्हणता सख्य होते त्यासी ।।७।।