भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलीमाजें संत जाले । टिळा टोपी लाविती भले

kalimajen sant jale | tila topi laviti bhale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलीमाजें संत जाले । टिळा टोपी लाविती भले ॥१॥ नाहीं वर्माचें साधन । न कळे हृदयीं आत्मज्ञान ॥२॥ सदा सर्वदां गुरगुरी । द्वेष सर्वदां ते करी ॥३॥ भजनीं नाहीं चाड । सदा विषयीं कबाड ॥४॥ ऐसिया संतांचा सांगात । नको मजसी आदिअंत ॥५॥ भोळियाच्या पायीं । एका जनार्दनीं ठाव देई ॥६॥