भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं

kalpatarukhalin | phalen yeti magitalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं ॥१॥ तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ध्रु.॥ द्यावें तें उत्तर । येतो प्रतीतीचा तो फेर ॥२॥ तुका म्हणे मनीं । आपुल्या च लाभहानि॥३॥