भजनी मालिका

भजने

कल्पनेचे जळीं वासना काल्लोळीं । बुडाले भवजळीं नामहीन ॥१॥ तयाच्या धांवण्या कोण धांवे देव । ऐसा तो उपाव नेणेचिना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कल्पनेपासुनी कल्पिला जो ठेवा । तेणें पडे गोंवा नेणें हरि ॥१॥ दिधल्यावांचुनि फलप्राप्ति कैंची । इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कल्पित देह कल्पित प्रबंध । कल्पित षट् चक्रमाळा । कल्पित धारण कल्पित सुषुम्ना । कल्पित मेरुमंडळ रे ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

कल्पोकल्पीं युगायुगीं । व्यवसाय हाचि तुम्हांलागीं ॥१॥ करावें दासाचें पाळण । निवारुनि त्यांचा शिण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कल्मष हरती जयाचेनि नामें । तें विसरोनि काय करावें ॥१॥ संसारतारक विसांवा हरि । गर्भवास चुकवी तो मुरारि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि ॥१॥ आश्वासिलें नारायणें । प्रेमदानें अंतरिंच्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कल्याणींचा सिंपी हरिभक्त गोमा । त्याची कांता उमा नरहरिभजनीं ॥१॥ सरिता सुकृताची त्या पोटीं उत्पन्न । जाली संबोधन गोणाबाई ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां ॥१॥ तूं काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता झालें जिणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कळवळी मन नाहीं देहभान । वटेश्वर सोपान सोंवळे जाले ॥१॥ संत साधुजन होत कासाविसी । आले सामाधीपाशीं तांतडीनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कळा ते कुसरी नव्हे हें शाब्दिक । अणुरेणु एक भरुनी उरला ॥१॥ तोचि डोळाभरी पहा श्रीहरीं । परेपरता दुरी ठसावला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कळा तो अभ्यास कासया करणें । निवृत्ति नाम घेणें धणीवरी ॥१॥ धणीवरी नाम घेईं पां अंतरीं । निवृत्ति बाह्यात्कारीं होईल तुझी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ