भजनी मालिका

भजने

कवण स्तुति करूं कवणिया वाचे । ओघ संकल्पाचे गिळिलें चित्तें ॥ १ ॥ मन हें झालें मुकें मन हें झालें मुकें । अनुभवाचें हें सुखें हेलावलें ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

कवणाचें कारण न लगेचि कांहीं ।सर्वी सर्वांठायीं तूं मज एक । कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काई न दिसे देवा ॥१॥ कवणा पाषाणासी धरूनिया भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां । म्हणऊनि निश्चित राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कवणावरी आतां देऊं हें दूषण । माझें मज भूषण गोड लागे ॥१॥ गुंतलासे मीन विषयाचें गळीं । तैसा तळमळी जीव माझा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कवणांशीं भांडों कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण ॥१॥ धरिलें उदास दुरदुरांतरें । सांडी एकसरें केली माझी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कवण्या योगें तल्लिनता । ऐशी जडोनी ठेली चित्ता ॥१॥ हें मी नेणें गा श्रीपती । तुमची करणी तुम्हां हातीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करुनि मुख ॥१॥ दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननीबाळकामध्यें भेद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कवळाचिया सुखें । परब्रम्ह झालें गोरखें । हात गोऊनि खाय मुखें । बोटासांदी लोणचें ॥१॥ कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रम्हादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कवेश्वरांचा तो आम्हांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥ दंभाचे आवडी बहिराट अंधळे । सेवटासि काळें होईल तोंड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कशासाठीं तुम्हां शरण रिघावें । आमुचें वारावें सुख दु:ख ॥१॥ आमुचें संचित भोग क्रियामान । तुमचें कारण तुम्हीं जाणा ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कष्ट न करितां योग्य जरी साधी । श्रम ते उपाधि वाउगी कां बा ॥१॥ नाम तें सोपें श्रम नाहीं कांहीं । उच्चारितां पाहीं सर्व जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ