भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पना कोंडूनि मन हें मारिलें

kalpana konduni man hen marilen

कल्पना कोंडूनि मन हें मारिलें । जीवन चोरिले सत्रावीचें ॥ १ ॥ साजीव सोलीव निवृत्तिची ठेव । कृष्ण हाचि देव ह्रदयीं पूजी ॥ २ ॥ विलास विकृति नाहीपै आवाप्ति । साधनाची युक्ति हारपली ॥ ३ ॥ निवृत्ति कारण योगियांचे ह्रदयीं । सर्व हरि पाही दिसे आम्हां ॥ ४ ॥