भजनी मालिका

भजने

करूनि नवस मागती ते पुत्र । परी तो अपवित्र होय पुढे ॥१॥ नासोनियां धर्म करी वेडेचार । भोगिती अघोर पापमती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं ॥१॥ जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करूनी आइती सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे । न येचि देव येतील कामलहरी रे । पडिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी वो रे ॥१॥ सर गा परता तुझा कळला भाव । कार्या पुरतें हें दाविसी लाघव रे । बोलतोसी तें अवघी तुझी माव रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करूनी चिंतन खेळों भोवतालें । चित्त येथें आलें पायांपाशीं ॥१॥ येथें नाहीं खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कर्ता एक देव तेणें केलें सर्व । तयापासी गर्व कामा नये ।। देह हें देवाचें वित्त कुबेराचें ।

रचनाकार: संत रामदास

कर्म आणि धर्म अष्टांग साधन । नको यज्ञदान नाम जपें ॥१॥ तुटेल बंधन खुंटेल पतन । नाममुखीं गर्जन सोपा मंत्र ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कर्म उपासना न कळें जयांसी । तेणें संतांसी शरण जावें ॥१॥ सर्व कर्मभावें विठ्ठलनाम गावें । जाणिवेनेणिवेचें हावें पडुं नये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कर्म करतां काहीं न कळे विचार । परि द्वेषाद्वेष संचार होतां असे ॥१॥ राजस तामस सात्विक तें देखा । उपाधी ते देखा मूळ जाणा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कर्म करसी तरी कर्मठचि होसी । परि निष्कर्म नेणसी कर्मामाजीं ॥१॥ ब्रह्मालागीं कर्म सांडणें हें कुंडें । पाय सांडोनि पुढें चालुं पाहसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ