भजनी मालिका

भजने

करुनियां काला सर्व आले गोकूळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं ॥१॥ वोवाळिती श्रीमुख कुर्वडी करिती । रामकृष्णातें सर्व वोवाळिती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करुनियां स्नान नामा बाहेरी आला । परिसाचा मेळा घेउनी हातीं ॥१॥ घेउनी परीस सांगे परिसासी । तुझा निश्चयेंसी वोळखून घेईं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करुनी कीर्तन मागती जे द्रव्य । तें जाणावें वैधव्य विधवेचें ॥१॥ सर्व अलंकार शरीर शोभलें । वायांपरी गेलें कुंकुहीन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करूं करूं म्हणता गेले वायांविण संसार तो शीण केला वेगी ॥१॥ अधमा न कळे अधमा न कळे । झांकोनियां डोळे घाणा नेतीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करूं देईना मज दुध तुप बाई । मथितां दधि तो धरी रवीं ठायीं ठायीं । हट्टे का कदापि नुमजे समजाविल्यास काई । समजाउनी यातें तुझ्या घरांत नेई नेई ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

करूं याची कथा नामाचा गजर । आम्हां संवसार काय करी ॥१॥ म्हणवूं हरीचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें कळिकाळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम