भजनी मालिका

भजने

कर्म केवळ देहाच्या माथां । आत्मा देही असोनि विदेहता । शेखीं म्हणती तत्त्वतां । कर्में बांधला आत्मा ॥१॥ आकाश जातां दळे । तैं कर्मीं ब्रह्मा आतळे । कर्म अकर्मा नातळे । परब्रह्मा रया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कर्मजड मूढ पतीत पामर । भवसिंधु पार नटके जया ॥१॥ यालागीं पंढरी केली मुक्ति पेंठ । भक्तें भूवैकुंठ वसविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कर्माच्या पोटीं भ्रम । कीं भ्रमाच्या पोटीं कर्म । हें दोहींचे न कळे वर्म । जाणत्यासी ॥१॥ घटीं उदक भरिलें । तेणें घटाकाश नव्हे बोले । कर्मीं ब्रह्मा संचलें । कर्मातीत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥ विधीतें वाळिलें निषेधा गिळिलें । सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कर्मी कर्मठपणा धर्मीं धर्मिष्ठपणा । हीं दोन्हीं अनुसंधानें चुकती जगीं ॥१॥ कर्माचें जें कर्म धर्माचा अधिधर्म । तो हा सर्वोत्तम विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कर्मे वांटिलीं चहूं वर्णा । क्षत्रिय वैष्य आदि ब्राम्हणा । वेदपुरुषा नारायणा । गुणविवंचना तुज हातीं ॥१॥ यज्ञ षटकर्मे ब्राहमाणांसी । क्षात्रदान क्षत्रियांसी । कृषीगोरक्षवाणिज्य वैश्यासी । सेवा शूद्रासि याचिते ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कलंकी अवतार पुढें होईल श्रीहरी । लोपोनी जातां धर्म मग अवतार धरी ॥१॥ दहा अवतार भक्ताकारणें घेतो । भक्ताची आवडी म्हणोनी गर्भवासा येतो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कलत्रपुत्रबाधा अभिमानाची । तेही त्याजिल्या शेखी त्यागी म्हणे निजाची ॥१॥ अभिमान कैसेनि सरे। ही कृपा कीजे माहेरें दातारा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥ ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कलिमाजीं दैवतें उघड दिसती फार । नारळ आणि शेंदुर यांचा भडिमार ॥१॥ लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचें धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कलियुगामाजीं एक हरिनाम साचें । मुखे उच्चारितां पर्वत छेदी पापांचे ॥१॥ सर्वभावें भजा एक हरीचें नाम । मंगळा मंगल करील निर्गुण निष्काम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कलियुगामाजीं थोर जाले पाषांड । पोटासाठीं संत जाले उदंड ॥१॥ नाहीं विश्वास संतदया मानसीं । बोलती वायांविण सौरस अवघा उपहासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ