भजनी मालिका

भजने

कळावंताच्या कळाकुसरी । त्या मी नेणें ना श्रीहरी ॥१॥ वारा धांवे भलत्या ठायां । तैसी माझी रंग छाया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

कळासूत्रीं तुम्ही नाटका नटक । देव ब्रम्हादिक आज्ञाधार ॥१॥ न सांगतां कळे सर्व अंतरींचें । सकळही जीवाचें मनोगत ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कळिकाळ बापुडें नामापुढें दडे । ऐसे थोर पोवाडे श्रीरामाचे ॥१॥ ऐसे वर्म सोपें सांडोनी शिणती । वायां हीन होती हांव भरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

कळिच्या काळा नागवती । जिहीं विठ्ठल धरिली चित्तीं ॥१॥ तेचि देव झाले अंगे । अहंमोह ममतात्यागें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा ॥१॥ तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥ काय करूं देवा दाटलों जाचणी । न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

कळेल हें तैसें गाईन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥१॥ करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आटकेली ॥१॥ जोडूनि अक्षरें केलीं तोंडपिटी । न लगे शेवटीं हातीं कांहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कळों नये तों चि चुकावितां बरें । मग पाठमोरें काय काज ॥१॥ धरिलेती आतां द्या जी माझा डाव । सांपडतां भाव ऐसा आहे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम