भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पतरूअंगीं इिच्छलें तें फळ । अभागी दुर्बळ भावी सिद्धी

kalpataruangin iichchhalen ten phal | abhagi durbal bhavi siddhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कल्पतरूअंगीं इिच्छलें तें फळ । अभागी दुर्बळ भावी सिद्धी ॥१॥ धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥ बीजाऐसा द्यावा उदकें अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥२॥ तुका म्हणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥३॥