भजनी मालिका
← भजनांकडे परत

करोनियां दया । सांभाळा जी देवराया

karoniyan daya | sambhala ji devaraya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
करोनियां दया । सांभाळा जी देवराया ॥१॥ मी तो पतीत पतीत । तुमचाचि शरणांगत ॥२॥ लाज येईल तुमचे नांवा । मज उपेक्षितां देवा ॥३॥ आपुलें जतन । करा अभय देवोन ॥४॥ चोखा म्हणे हरि । आतां भीड न धरीं ॥५॥