भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूनी चिंतन खेळों भोवतालें । चित्त येथें आलें पायांपाशीं

karuni chintan khelon bhovatalen | chitta yethen alen payampashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूनी चिंतन खेळों भोवतालें । चित्त येथें आलें पायांपाशीं ॥१॥ येथें नाहीं खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥ध्रु.॥ सुखदुःखें तुज देऊनी सकळ । नाहीं ऐसा काळ केला आम्ही ॥२॥ तुका म्हणे जाला देहाचा विसर । नाहीं आतां पर आप दोन्ही ॥३॥