भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्म करितां फलाशा वाढे । तें तें फल भोगणें घडे

karma karitan phalasha vadhe | ten ten phal bhoganen ghade

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कर्म करितां फलाशा वाढे । तें तें फल भोगणें घडे ॥१॥ कर्म करितां फळ बाधक । न करितां प्राप्त नरक ॥२॥ ऐशीं कर्माची रहाटी । सदैव देखे उफराटी ॥३॥ एका जनार्दनीं कर्म । तेथें कैंचा भवभ्रम ॥४॥