भजनी मालिका

भजने

करी जो सृष्टीचे रचन । तया न कळे बह्माज्ञान । तो श्रीनारायण । शरण रिघे ॥१॥ न कळे न कळे ब्रह्माज्ञान । म्हणोनिक धरितसे चरण । नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रह्मा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥१॥ रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करी हरिकथा टाकी दंभमान । वायंचि पतन पडूं नको ॥१॥ नामाचा विश्वास संतांचा सांगात । तेणें तुझें हित सर्व होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

करीन कैवाड हाचि अनुदिनीं । तुमच्या चिंतनीं पांडुरंगा ॥१॥ नेदीं जाऊं वांयां घटिका एकी पळ । करुं सर्वकाळ हेचि चर्चा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

करीना साधन जिवासी बंधन । कोणे काळीं मन नोहे शुद्ध ॥१॥ करूं जातां तप अभिमानरूप । त्रिविधादि ताप कैसा निवे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करील जो प्रश्र सांगेल जो कथा । श्रवण करितां उद्ध-रती ॥१॥ कथा भागिरथी स्नान जे करिती । त्याचे उद्धरती पूर्वज ते ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करील तें काय नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥१॥ मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करुं येईल अंगिकार । तरी करा फार काय बोलों ॥१॥ नाहीं घोंकिलें ऐकिलें कांहीं । सेवा घडली नाहीं वैष्णवांची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

करुणा बहुत तुझ्या चरणापाशीं । धांवोनि ह्लषिकेशी आलों सर्व ॥१॥ वाळुवंटीं उभे पताकांचे भार । पाहोनि शंकर वेडावला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

करुणावचनीं बोलतसे स्ववाणी । कृष्णाचा बंधु जन म्हणताती ॥१॥ ऐकोनियां दूत हांसती मानसीं । जगदबंधु सर्वांसी होय दुरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ