भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्म करसी तरी कर्मठचि होसी । परि निष्कर्म नेणसी कर्मामाजीं

karma karasi tari karmathachi hosi | pari nishkarma nenasi karmamajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कर्म करसी तरी कर्मठचि होसी । परि निष्कर्म नेणसी कर्मामाजीं ॥१॥ ब्रह्मालागीं कर्म सांडणें हें कुंडें । पाय सांडोनि पुढें चालुं पाहसी ॥२॥ डोळ्यांची नव्हाळी घेवों जातां करतळी । पाहों जातां मुळीं पाहणेंचि नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं सर्व कर्म पाहीं । सांडी मांडी नाहीं तये ठायीं ॥४॥