भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती

karkashasangati | duhkh udand phajiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥१॥ नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥ वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥२॥ तुका म्हणे पायीं बेडी । पडिली कपाळीं कुऱ्हाडी ॥३॥