भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूं याची कथा नामाचा गजर । आम्हां संवसार काय करी

karun yachi katha namacha gajar | amhan sanvasar kay kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूं याची कथा नामाचा गजर । आम्हां संवसार काय करी ॥१॥ म्हणवूं हरीचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें कळिकाळ ॥ध्रु.॥ आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥२॥ तुका म्हणे करूं ऐसियांचा संग । जेणें नव्हे भंग चिंतनाचा ॥३॥