भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूं जातां सन्निधान । क्षण जन पालटे

karun jatan sannidhan | kshan jan palate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूं जातां सन्निधान । क्षण जन पालटे ॥१॥ आतां गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥ध्रु.॥ हरी दासांचा समागम । अंगी प्रेम विसावा ॥२॥ तुका म्हणे केला त्याग । सर्वसंग म्हणऊनि ॥३॥