भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुनी आरती। नामा आला घराप्रती

karuni arati| nama ala gharaprati

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
करुनी आरती। नामा आला घराप्रती ।।१।। तेणें धरियेलें व्रता। अन्न न घ्यावें सर्वथा ||२|| ऐसा जाणोनियां नेम अनुभवी पुरुषोत्तम ||३|| आषाढी एकादशी। विप्रवेयें इषीकेशी ||४|| आला नामयाचे सदनीं । नाम गाय दासी जनी ॥५॥