भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुनियां काला सर्व आले गोकूळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं

karuniyan kala sarva ale gokulin | gopalansahit gaivatsa sakalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करुनियां काला सर्व आले गोकूळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं ॥१॥ वोवाळिती श्रीमुख कुर्वडी करिती । रामकृष्णातें सर्व वोवाळिती ॥२॥ जाहला जयजयकार आनंद सकळां । एका जनार्दनीं धणी पाहतां डोळां ॥३॥