भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूं हरीचें कीर्तन । गाऊं निर्मळ ते गुण

karun harichen kirtan | gaun nirmal te gun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
करूं हरीचें कीर्तन । गाऊं निर्मळ ते गुण ॥१॥ सदा धरूं संतसंग । मुखीं म्हणूं पांडुरंग ॥२॥ करूं जनावरी कृपा । रामनाम म्हणवूं लोकां ॥३॥ जनी म्हणे कीर्ति करूं । नाम बळकट धरूं ॥४॥