भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूं हरीचें कीर्तन गाऊं निर्मळ ते गुण

karun harichen kirtan gaun nirmal te gun

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
करूं हरीचें कीर्तन गाऊं निर्मळ ते गुण ।।१।। सदा धरू संतसंग मुखी म्हणूं पांडुरंग ॥२॥ करूं जनावरी कृपा रामराम म्हणवू लोकां ॥ ३॥ जनी म्हणे कीर्ति करूं नाम बळकट धरूं ॥४॥