भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

देव आड आला । तो मी भोगिता उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा ॥१॥ जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥ देव न लगे देव न लगे । सांठवणाचे रुधले जागे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देव जाणता देव जाणता । आपुलिया सत्ता एकाएकी ॥१॥ देव चतुर देव चतुर । जाणोनी अंतर वर्ततसे ॥ध्रु.॥ देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळ तुका म्हणे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥१॥ पर्वपक्षी धातु धिक्कारिलें जन । स्वयें जनार्दन ते चि झाले ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥ तया बरें फावे देवा चुकवितां । संचिलाची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देव त्यां फावला भाविका गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥ नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफार ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देव पाहावया करी वो सायास । न धरी हे आस नाशिवंत ॥१॥ दिन शुध्द सोम सकाळी पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ध्रु.॥ द्विजां पाचारुनी शुद्ध करी मन । देई वो हे दान यथाविधी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥ भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम