भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव बराडी देव बराडी । घाली देंठासाठी उडी

dev baradi dev baradi | ghali denthasathi udi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव बराडी देव बराडी । घाली देंठासाठी उडी ॥१॥ देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचें कवाड ॥ध्रु.॥ देव भाविक भाविक । होय दासाचें सेवक ॥२॥ देव होया देव होया । जैसा ह्मणे तैसा तया ॥३॥ देव लाहान लाहान । तुका ह्मणे अनुरेण ॥४॥