भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव बासर देव बासर । असे निरंतर जेथें तेथें

dev basar dev basar | ase nirantar jethen tethen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव बासर देव बासर । असे निरंतर जेथें तेथें ॥१॥ देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥ध्रु.॥ देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवीं जडे ॥२॥ देव बावळा देव बावळा । भावें जवळा लुडबुडी ॥३॥ देव न व्हावा देव न व्हावा। तुका म्हणे गोवा करी कामीं ॥४॥