भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव झाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले

dev jhale avaghe jan | majhe gun dosh harapale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव झाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले ॥१॥ बरवें जालें बरवें जालें । चित्त धालें महालाभें ॥ध्रु.॥ दर्पणीचें दुसरें भासे । परि तें असे एक तें ॥२॥ तुका म्हणे सिंधुभेटी । उदका तुटी वोहोळासी ॥३॥