भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव तिला आला । गोडगोड जीव धाला

dev tila ala | godagod jiv dhala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव तिला आला । गोडगोड जीव धाला ॥१॥ साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥ पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥२॥ तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनीं ॥३॥