भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥१॥ नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचिये पायीं देई मना बुडी । नको धांवों वोढी इंद्रियांचे ॥१॥ सर्व सुखें तेथें होती एकवेळे । न सरती काळें कल्पांतीं ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं कलेवर ओंवाळूनि ॥ ॥ नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥ करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा संसारासी ॥१॥ देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥१॥ धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें कवणिया गांवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥ हातावरी हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥ वाहिलें देह हें देवा एकसरें । होईल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचे भजन कां रे न करीसी तैसे । अखडं हव्यासे पीडतोसी ॥१॥ देवासी शरण कां रे नवजासी तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागी ॥ध्रु॥ देवाचा विश्वास कां रे नाही तैसा । पुत्रस्नेहे जैसा गुंतलासी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥१॥ आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें ॥१॥ लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका थारा देऊं कोणी ॥१॥ मोडिलें रांडेणे सुपंथ मारग । चालविलें जग यमपंथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥ ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवाच्या संबंधें विश्व चि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥१॥ आहाच हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥१॥ पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्में महा दोष ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवासाठी जाणा तयासी च आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी ॥१॥ निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवासी तो पुरे एकभाव गांठी । तोचि त्याचे मिठी देईल पायीं ॥१॥ पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवासी लागे सकळांसी पोसावें । आम्हां न लगे खावें काय चिंता ॥१॥ देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम