भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव पाहों देव पाहों । उंचे ठायीं उभे राहों

dev pahon dev pahon | unche thayin ubhe rahon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव पाहों देव पाहों । उंचे ठायीं उभे राहों ॥१॥ देव देखिला देखिला । तो नाहीं कोणां भ्याला ॥ध्रु.॥ देवासी कांहीं मागों मागों । जीव भाव त्यासी सांगों ॥२॥ देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥३॥ देव कातर कातर । तुका म्हणे अभ्यंतर ॥४॥