कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे
kamatur chavi sandi | baral tondin barale
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥१॥ रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
kamatur chavi sandi | baral tondin barale
कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥१॥ रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥
kamatura bhay laj na vichar | sharir asar trunatulya
कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥१॥ नवल हे लीळा करात्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥
kamammadhyen kam | kanhin mhana ramaram | jail bhavashram | sukh hoil duhkhachen
कामांमध्यें काम । कांहीं म्हणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होईल दुःखाचें ॥१॥ कळों येईल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥
kamen pidilon maya | bahu mari nahin daya
कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥१॥ तुझ्या राहिलों आधारें । झालें अवघें चि बरें ॥ध्रु.॥
kay atan yasi mhanaven lenkarun | jagacha ha guru mayabap
काय आतां यासि म्हणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥१॥ माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥२॥
kay amhan chalavisi vayanvin | mhanasi durun dekhilasi
काय आम्हां चाळविसी वायांविण । म्हणसी दुरून देखिलासि ॥१॥ लावूनियां डोळे नव्हतों दुश्चित । तुज परचित्त माव होती ॥२॥
kay amhin kelen aisen | nuddharijesen sangaven
काय आम्हीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥१॥ हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥
kay amhi bhakti karanen kaisi | kay ek vahaven tumhansi | avagha bharoni uralasi | vanin khanin rasin rupagandhi
काय आम्ही भक्ती करणें कैसी । काय एक वाहावें तुम्हांसी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥१॥ कसें करूं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥२॥
kay ahmin atan pot chi bharaven | jag chalavaven bhakta hmun
काय आह्मीं आतां पोट चि भरावें । जग चाळवावें भक्त ह्मुण ॥१॥ ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥
kay unen amhan vithobache pai | nahin aisen kai yethen ek
काय उणें आम्हां विठोबाचे पाई । नाहीं ऐसें काई येथें एक ॥१॥ ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥
kay unen kan karitosi chori | kiti sangon tuj naikasi hari
काय उणें कां करीतोसी चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी । परेपरता तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥१॥
kay unen jhalen tuj samarthasi | aisa majapashin kon dosh
काय उणें झालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥१॥ जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥२॥
kay unen maj panduranga payin | riddhisiddhi thayin volagati
काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धी ठायीं वोळगती ॥१॥ कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आम्ही ॥ध्रु.॥
kay urali te karun vinavani | vechalon vachanin panduranga
काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा ॥१॥ अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ध्रु.॥
kay ekan jalen ten kan nahin thaven | kay hen sangaven kay hmun
काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण ॥१॥ देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥
kay aisa janma java vanyanvin | kanhin tari run aso mathan
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥१॥ कोणे तरी काळें होईल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥
kay aisa sanga | dharma maj panduranga
काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥१॥ तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥
kay aisi vel | vodavali amangal
काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥१॥ आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥
kay karatil kelin nitya papen | vase nam jyapen vithobachen
काय करतील केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥१॥ तृणीं हुताशन लागला ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें ॥ध्रु.॥
kay karaven ten atan | jalen nayesen bolatan
काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥१॥ नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥