भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥१॥ म्हणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥१॥ काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें ॥१॥ सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तूं च ग्वाही आपुला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय नाहीं माझे अंतरीं वसति । व्यापक हा भूतीं सकळां नांदे ॥१॥ चित्तासी प्रसाद होईल चळण । तें चि तें वळण मनासही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥१॥ काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥१॥ काय ऐसा भक्त वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं ॥१॥ जरी मागों पद इंद्राचें । तरी शाश्वत नाहीं त्याचें॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काय माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी लोकां दाविली ते ॥१॥ खरी करूनियां देई माझी आळी । येऊनि कुरवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम