भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां

kay karaven ten atan | jalen nayesen bolatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥१॥ नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥ होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥२॥ तुका म्हणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥३॥