भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ

kay aisi vel | vodavali amangal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥१॥ आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥ पापाचिया गुणें । त्यांचिया वेळे दर्षणें ॥२॥ तुका म्हणे कानीं । घालूं आले दुष्टवाणी॥३॥