भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥१॥ तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कांडील्या कुटल्या होतो मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥१॥ राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥१॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥ तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं ॥१॥ पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतांचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कान्हो एकली रे तुजसवें चुकलें रे । भय वाटे जनीं मज अबळा धाकली रे ॥१॥ निघतां घरीं आई बा वारी । तुजसवें कां आलियें हरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कान्होबा आतां तुम्ही आम्ही च गडे । कोणाकडे जाऊं नेंदूं ॥१॥ वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट । पाहिलें वाईट । बोलोनियां वोखटे ॥१॥ परि तूं न संडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पाडिसी रोकडी । तुटी माये आम्हांसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा ॥१॥ चुकी झाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वह्या राखिल्या॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥१॥ कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । झाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्‍या ॥१॥ देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरी मेळीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कामक्रोध माझे लावियेले पाठीं । बहुत हिंपुटीं झालों देवा ॥१॥ आवरीतां तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्तीं आश्चर्य हें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कामाचा अंकित कांतेतें प्रार्थित । तूं कां हो दुश्चित्त निरंतर ॥१॥ माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम