भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

कवणांशीं भांडों कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण ॥१॥ धरिलें उदास दुरदुरांतरें । सांडी एकसरें केली माझी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करुनि मुख ॥१॥ दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननीबाळकामध्यें भेद ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कवळाचिया सुखें । परब्रम्ह झालें गोरखें । हात गोऊनि खाय मुखें । बोटासांदी लोणचें ॥१॥ कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रम्हादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कवेश्वरांचा तो आम्हांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥ दंभाचे आवडी बहिराट अंधळे । सेवटासि काळें होईल तोंड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कंसरायें गर्भ वधियेले सात । म्हणोनि गोकुळासी आले अनंत । घ्यावया अवतार जालें हें चि निमित्य । असुर संहारूनि तारावे भक्ती ॥१॥ जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कस्तुरी भिनली जये मृत्तिके । तयेसी आणिके कैसी सरी ॥१॥ लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कस्तुरीचें अंगीं मीनली मृत्तिका । मग वेगळी कां येईल लेखूं ॥१॥ तयापरि भेद नाहीं देवभक्तीं । संदेहाच्या युक्ती सरों द्याव्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥१॥ आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां गा कोणी न म्हणे पंढरीची आई । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥१॥ तेव्हां माझ्या मना होय समाधान । जाय सर्व शीण जन्मांतरिंचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कां जी आम्हां होतें दोषाचें दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥१॥ पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां जी तुम्हीं ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझें चित्त ठायीच्या ठायीं ॥१॥ कांही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥१॥ म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥१॥ कैसा कंठूनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पाप यांचें ॥१॥ पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम