भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण

kay ekan jalen ten kan nahin thaven | kay hen sangaven kay hmun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण ॥१॥ देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥ काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥२॥ कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥३॥ कां हें आवडलें प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ॥४॥ कां हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हे रामराम न म्हणती ॥५॥ काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥६॥ काय करिती हे बांधलिया काळें । तुका म्हणे बळें वज्रपाशीं ॥७॥