भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाठी घेती प्रतिग्रह

aise nana bhesh gheuni hindati | potasathi gheti pratigrah

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाठी घेती प्रतिग्रह ॥१॥ परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥२॥ जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका म्हणे ॥३॥