भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें

onamyachya kalen | khaden mandavilen balen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥१॥ तें चि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ध्रु.॥ रज्जु सर्प होता । तोंवरी चि न कळतां ॥२॥ तुका म्हणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥३॥