भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे सांडुनियां घुरे । किविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृत्तिका

aise sanduniyan ghure | kivilavani disan kan re | kamen ur bhare | hatin nure mruttika

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसे सांडुनियां घुरे । किविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृत्तिका ॥१॥ उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ध्रु.॥ न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरीं । त्याचा तोचि करी । पारपत्य सकळा ॥२॥ नाहीं आडकाठी । तुका म्हणे जातां भेटी । न बोलतां मिठी । उगी च पायीं घालावी ॥३॥