भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें भाग्य कई लाहाता होईन । अवघें देखें जन ब्रम्हरूप

aisen bhagya kai lahata hoin | avaghen dekhen jan bramharup

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसें भाग्य कई लाहाता होईन । अवघें देखें जन ब्रम्हरूप ॥१॥ मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें सागर हेलावती ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया मूर्तीमंत अंगीं । परावृत्त संगीं कामादिकां ॥२॥ विवेकासहित वैराग्याचें बळ । धगधगित ज्ज्वाळ अग्नी जैसा ॥३॥ भक्ती नवविधा भावशुद्ध बरी । अळंकारावरी मुगुटमणि ॥४॥ तुका म्हणे माझी पुरवी वासना । कोण नारायणा तुजविण ॥५॥