भजनी मालिका
← भजनांकडे परत

ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धी

olen mul bhedi khadakachen ang | abhyasasi sang karyasiddhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥ नव्हे ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरि ॥ध्रु.॥ दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥२॥ तुका म्हणे कैंचा बैसण्याची ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकीं ॥३॥