एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती
evadhi apakirti | aikoniyan phajiti
एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥१॥ जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
evadhi apakirti | aikoniyan phajiti
एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥१॥ जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ध्रु.॥
aik bai tuj vo kanhin sangaten shakun | nijaliya bhur hosi jagen mhanaun
ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें म्हणउन ॥१॥ मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसि ॥ध्रु.॥
aik re jana tujhya svahitachya khuna | pandharicha rana manamaji smarava
ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥
aikaton dat | ale ekanchen bobhat
ऐकतों दाट । आले एकांचें बोभाट ॥१॥ नका विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ध्रु.॥
aikalya navhe khel chang | dharila sang mhanauni
ऐकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग म्हणऊनि॥१॥ उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥
aika aika bhavikajan | kon kon vhal te
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥ तर्कीकाचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥ध्रु.॥
aika kalichen hen phal | pudhen hoil bramhaghol
ऐका कलीचें हें फळ । पुढें होईल ब्रम्हघोळ ॥१॥ चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंक्ती ॥ध्रु.॥
aika ga e avaghe jan | shuddha man ten hit
ऐका गा ए अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥१॥ अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावें ॥ध्रु.॥
aika ga e bhai | saravada sangato kai | yethen nadel mai | doghan putranchi | te kariti tichi vitambana | avaghya prasaddhi jana | ek na maritan shahana | to jana sukh na pave
ऐका गा ए भाई । सरवदा सांगतो काई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची । ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसद्धि जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥१॥ आणीक ऐका गाए । सरवदा सांगतो काय । खरें चि बोले तो जाय । नरकामध्यें अधोगती । हें चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें । अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ध्रु.॥
aika ji deva majhi vinavani | mastak charanin thevitasen
ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ सन्निध पातलों सांडूनियां शंका । सन्मुख चि एकाएकीं पुढें ॥ध्रु.॥
aika ji santajan | sadar man karuni
ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥१॥ सकळांचें सार एक । कंटक ते त्यजावे ॥ध्रु.॥
aika panditajan | tumache vanditon charan
ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥१॥ नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥
aika mahima avadichin | boren khay bhilatichin
ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥१॥ थोर प्रेमाचा भुकेला । हाचि दुष्काळ तयाला ॥ध्रु.॥
aika vachan hen sant | mi ton agala patit | kay kajen prit | karitasan adaren
ऐका वचन हें संत । मी तों आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें ॥१॥ माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकांचिये वांहीं । एक देखीं मानिती ॥ध्रु.॥
aika santajan uttaren majhe bobade bol | karin lad tumhampudhen ho koni jhani kopal
ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुम्हांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥१॥ उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुम्ही धरावें चित्तीं ॥ध्रु.॥
aika hen vachan majhen santajan | vinaviton jodun kar tumhan
ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुम्हां ॥१॥ तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥
aiken panduranga vachan majhen ek | jhalon mi sevak das tujha
ऐकें पांडुरंगा वचन माझें एक । झालों मी सेवक दास तुझा ॥१॥ कळे तैसा आतां करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढें ॥ध्रु.॥
aiken vachan kamalapati | maj rankachi vinanti
ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥ कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥
aikoniyan kirti | aisi vatati vishranti
ऐकोनियां कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती ॥१॥ माते सुख डोळां पडे । तेथें कोण लाभ जोडे ॥ध्रु.॥
aisha bhagyen jalon | tari dhanya janma alon
ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों ॥१॥ रुळें तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥ध्रु.॥