भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

सेंदरीं हेंदरीं दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥ आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥ मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आकर्षावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥ आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं ढळों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥ काय देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शिक्तहीन झाले दिसां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥ घेईल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदी जनां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवट तो होती तुझियानें गोड । म्हणऊनि चाड धरीतसों ॥१॥ देऊं भोगाभोग कलिवरचा भार । साहों तुज थार त्याचमधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥ न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥ विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन किडा ॥१॥ ऐसें जन्म आतां मज देई देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सैन्य जन हांसे राया जालें काईं । वासपे तो ठायीं आपणासि ॥१॥ आपणा आपण जाय सतीं जैसीं । वैरभाव ज्यांसि भक्ति नाहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥१॥ मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साठी विकुं पाहे ॥१॥ पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥ परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम