भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥१॥ समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसा हें कीर्तनी ब्रम्हरस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सोयरिया करी पाहुणेरु बरा । कांडीतो ठोमरा संतालागी ॥१॥ गाईसी देखोनि बदाबदा मारी । घोडयाची चाकरी गोड लागे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें तें अंगणीं वैष्णवांच्या ॥१॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं ॥१॥ एकसरीं केलीं कलेवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सोसियेली आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥ वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सोसें बहुगर्भवासीं । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं । तेथें कोणी भेटलीं ॥१॥ करीं करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

सौरी सुर झालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं झालें सरती ॥१॥ चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥ तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥१॥ परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥ आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥१॥ खोटया तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरी बरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्त्रिया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥१॥ यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥ नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥१॥ आतां सोडवणे धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम